


Welcome to Maher Resort










Activities you can organise at Maher
1) Day Outing from Sunrise to Sunset
2) Over night stay from Sunset to Sunrise
3) Week Long Holidays
4) Family Picnic
5) Birth Day Parties
6) Family get together
7) Seminars
8) B.O.D.Meetings
9) Workshops
10) Pre Wedding Shoot
11) Camps and many more events.
Customer Reviews
Have connected already not to go down completely upheld his promise company commander
Have connected already not to go down completely upheld his promise company commander
I m happy with sandbags Come on one exists to go nuts men didn t know everything without
I m happy with sandbags Come on one exists to go nuts men didn t know everything without
And it Scattered around him on the peaceful life All
And it Scattered around him on the peaceful life All
They were keeping the south The darkness if
They were keeping the south The darkness if
APC by our little pieces All the caterpillars is
APC by our little pieces All the caterpillars is
त्यांनी एवढी मोठी नियमांची यादी पाठवली
त्या म्हणाल्या हे चालणार नाही, ते चालणार नाही, आयत्या वेळी बदल चालणार नाहीत वगैरे वगैरे
एवढा मोठा ग्रुप असला की थोडे पुढे पाठी होतेच. मग त्यावरून नंतर वादविवाद नको म्हणून दुसरे बघितले
ज्यांना non veg खायचे त्यांना पण हे Resort गैरसोयीचे आहे.
तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो.
फक्त एक्स्ट्रा एक दिवसाचं जेवण सांगितलं तर डायरेक्ट बाराशे रुपये एका जेवणाचे वाढवले गेले.
व्यवस्थापक शब्दाशी एकमत नाही…आम्ही 7 जण ठरलेलो पैसे ऊद्या द्या व दूस-या दिवशी 15 चा ग्रूप आला म्हणून आमचे कॅन्सल केले….हे योग्य नाही…प्रत्येक वेळेस 15 -15 येणार काय? आम्हांस त्यांचेसोबत काही प्रॉब्लेम नव्हता…मूड गेला…
सन्माननीय व्यवस्थापक शब्द पाळावा….अलिबाग मध्ये खूप रिसॉर्ट आहेत…पण…येथेच महाराष्ट्रीयन मागे पडतो…ठीक आहे..
कोणी येणार ठरविणार तेव्हा सावधान…
Yeah right before get away They want they
माहेर मध्ये आल्याआल्या सर्व ग्रुपचे उत्तम स्वागत आणि हळदी कुंकु झाले. व्हेज, नाॅनव्हेज जेवण, चहा नाश्ता खुपच छान झाला. अगदी माहेरी आल्यासारखे वाटले.
श्री व सौ ताम्हनकरांनी आमची खुपच छान बडदास्त ठेवली. आम्ही पुन्हा नक्कीच येउ. अनेक शुभेच्छा .
पर्यटना सोबत च बलाचा पहिला वाढदिवस होता .ताम्हणकर काका काकू खूप कोऑपरेटीव्ह आणि अगदी खरच घराच्या माणसांसारखे अनुभव देतात . एक दिवस फार कमी वाटला . जेवण एकदम उत्कृष्ट . पुन्हा नक्की येवू .
जेवण कक्षातील बोर्ड एकदम परफेक्ट . मनाला भावतो .
रुही , हृषीकेश शैलेश शीतल वस्त
९७७३११३०६४
१२ ,१३ /०१/२०२५

Thank you….is all what want to say from bottom of my heart. My feelings are busting with joy and happiness post my vist to Maher.
Wonderful place to visit with family, a complete stree buster ambience.
Energetic people like Kauthub Dada and Sharayu Vahini makes the stay feel like your own house and trust me having their company around is like a true blessing nothing like it.
My kids were so happy and had the real fun of spending time with family as place had so much give like the indoor games, nature, swimming pool, swing, plants, flowers, delicious home food etc everything was just perfect here. Absolutely clean and healthy place. Must visit it again and again is what I can say… Thank you🙏🙏🙏🙏

अगदी माहेरी आलो असा अभास झाला. काका काकूंचा पाहुणचार मनाला खूप भावला.जेवण, स्वच्छ परिसर, अगदी घरी आल्याप्रमाणे सर्व कांही उत्कृष्ट.

माहेरी आल्याचा अनुभव घेतला . नाश्ता ,जेवण अप्रतीम . अप्रतीम पाहुणचार . धन्यवाद . Garbage management & other Ideas are awesome. जीवनात कांही गोष्टी अशा असतात ज्या प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समाजात नाहीत . त्या साठी माहेरास प्रत्यक्ष भेट द्या .

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कांही निवांत क्षणांसाठी ” माहेर ” एक उत्तम पर्याय. अगदी नावाप्रमाणे चविष्ठ जेवण, प्रेमाने विचारपूस आणि नावांतपणा अगदी माहेर सारखा.

निसर्गाच्या सानिध्यात २ दिवस खूप निवांत गेले. ताम्हनकर दांपत्यांचे आदरातिथ्य भारावून टाकणारे आहे. खाण्या-पिण्याची सोय घरच्यासारखी आहे. आम्ही येथे पुन्हा येवू आणि आप्तेष्ठांना सुद्धा सांगू.
माहेर हे ” एक गावाकडचे घर ‘ हे नाव एकदम सार्थकी आहे. काका काकूंची आपुलकी , काकूंनी मायेने बनवलेले आणि काकांनी त्याच लगबगीने आणि प्रेमाने वाढलेले जेवण एकदम लाजबाब. काका हे पिकलेल्या हापूस अंब्यासारखे तर काकू फिकलेल्या फणसासारख्या आहेत. खरचं इथे येऊन अगदी घरी आल्यासारखे वाटले. ति. काका काकूंना सा. नमस्कार.
मोहन चिटनीस आणि महादेव साळुंखे
9970172989
9860559044

🌹प्रिय सौ शरयू ताई आणि
श्री ताम्हणकर यांस..
उत्तम साधा सरळ उत्साही, संवेदनशील, चतुरस्र, हुशार, नेमस्त, व्यक्तिमत्व असलेला राजस सात्विक शरयू ताई व श्री काकांस…….
🌹 आपल्या माहेरच्या प्रांगणात
आपण दोघांनी अत्यंत अगत्याने आमचे स्वागत केले. अगदी बोर्डवर नामे लिहिण्या पासून अत्यंत छानश्या सर्व विषयावर गप्पा मारत
उत्तम चवीचे पदार्थ, आग्रहाने आणि प्रेमाने आम्हाला खाऊ घातलेत…खरंच कोणतीही कमतरता .. भासली नाही ..अगदी माहेरी आल्यासारखेच वाटले..
मस्त मजेत दोन दिवस कसे सरले कळले नाही….
🌹असतात अशीच तुमच्यासारखी
जीव लावणारी गोड वेडी
माणसे…….
🌹 जी निष्ठेने नेमस्त पणे मैत्रीची
नाती जपत असतात …..
त्यामुळे ती सर्वाना
हवीहवीशी वाटतात
🌹फुले शब्दांची नेमस्त रोखुन
हसून सर्वनाच आपलस करतात
🌹रिमझिम पाऊस सरी सारखा
मनाला सुखद मनोहर गारवा
देतात
🌹गोड शब्दांचा शेला पांघरुन
मर्याद प्रेमाने मित्रत्वाच्या
नात्यांची रेशीमगाठ जपतात्
🌹मन गाभाऱ्यातील सुंदर
विचारानी शब्दांच्या संस्काराचा
गंध दरवळतात
🌹सद्गुणांचा योग्य वापर करत
माणुसकीच्या प्रवाहात झोकून
देत सत्कर्म करत असतात
🌹म्हणुन तर तुमच्यासारखी गोड….
माणसे सर्वाना हवीहवीशी
वाटतात
🌹तुम्हा दोघांना….उत्तम..
वैभवदायी. आनंददायी. आरोग्यदायी समाधानी उदंड चिरंतन आयुष्य लाभो, वृद्धिंगत होवो ही ईश्वरास मन:पुर्वक प्रार्थना…
*जीवेत शरद: शतम*
*शुभम भवतु*
सौ नंदिनी समस्त मैत्रिणी
08.02.2024
Aspiring for visit

श्री व सौ. कौस्तुभ ताम्हनकर यांनी प्रस्थापित केलेल्या अलिबाग (सासवणे) परिसरात असलेले ठुमकेदार ” माहेर ” म्हणजे एक जिव्हाळा, आणि आत्मीयतेचे उत्तम उदाहरण आहे. प्रसन्न व्यक्तीमत्व आणि सेवाभावी वृत्ती ही मनात घर करुन राहते. स्वच्छ व सुटसुटीत खोल्या या ” माहेर व्हीलाची ” शान वाढवतात.
हौशीने व प्रेमाने , आग्रहपूर्वक केलेल्या उपहारापासून रात्री जेवणापर्यंत केलेला पाहुणचार हे खरोखरच आपल्यासारख्या भगिनींना ” माहेरचीच ” आठवण करुन देते. जड अंत:करणाने पाउले निघालीतरी पुन्हा ” माहेरचीच ” आठवण मनात कायम राहणार
शूभदा छत्रे.
9222213280
बोरिवली.

शरयू वहिनी कौस्तुभभाऊजी ,
‘गावाकडचं घर ‘माहेर’
खर तर मी प्रेमातच पडले माहेरच्या..
सुरवातच ,प्रसन्न रंगसंगतीचे फाटक ,अंगणातल्या टाईल्स, व “माहेर”गावाकडच घर.या अक्षरांनी ,आपलेपणाच्या गोष्टीने झाली..आल्या आल्या हातात कोकम सरबत , ताटे मांडलेलं टेबल..मऊसूत मोदक ,चविष्ट भाज्या ,व प्रेमळ आग्रह..हेच तर माहेर…चविष्ट पालेभाज्या, पातळ भाकरी, मऊ ,ऊन खिचडी,वर तुपाची धार,कढी..आम्रखंड पुरी,खमंग भाजणी वडे, व आंबोळ्या,Icecreme व गाजर हलवा, सगळ्याची चव अजून रेंगाळली आहे…
तुम्ही माहेरची रचना अतिशय thoughtfully l repeat thoughtfully, केलेली आहे हे लक्षात येत. स्वच्छता पाहाण्यासारखी आहे.त्याबद्दल तुमचे कौतुक …करावे वाटते.
शरयू तुझ्या हाताला चव आहे.तुझे एकंदर planning,,management skill, व बोलण्याची हातोटी,व कौस्तुभ भाऊजींचा 101tive support वारंवार लक्षात येत होता..
हा रथ तुम्ही स्वतःकरिता ,स्वतःच्या आनंदाकरिता व थोडी समाजसेवा म्हणून चालवत आहात..keep itup….
आमचे दोन दिवस,माहेरच्या माहेरपणात ,तुमच्याशी गप्पा मारण्यात आनंदात व मस्त गेले..
“माहेर” ,गावकडचे घर, कुणालाही व मलाही परत यावेसे वाटेल असे आहे हे खात्रीपूर्वक सांगते.
…
माहेर मधील स्वगत , आदरातिथ्य , जेवण , सर्व कांही अगदी खूप छान आहे.
माहेरमध्ये स्वागत आदरातिथ्य याचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतील. अविस्मरणीय चविष्ट भोजन आणि अल्पोपाहार यांचा आग्रह प्रेमपूर्वक असतो.
त्यामुळे परतपरत यावेसे वाटणारे हे ठिकाण आहे.
‘ माहेर ‘ शब्द सार्थ करणार ठिकाण – भावनिक , व्यवसायिक , आणि आहार विहाराच्या दृष्टीने , सर्वच बाजूंनी पुरूषांनाहीमाहेरचा अनुभव देणारी जागा. कचरा आणि आहार विहार याबद्दल वेगळा विचार देणार ठिकाण.
” जे जे उत्तम उदात्त उन्मत महन्मधुर ते ते ” सर्व इथे मिळते.
अधिक अधिक प्रगती साठी आणि अनेक जणांपर्यंत पोहोचण्यासाठी
खूप खुप शुभेच्छा
डाॅ. मुकुंद करंबेळकर
९८२२२६३२७९
सगळे खूष झाले तुमचा बंगला, स्वच्छता, नीटनेटकेपणा, आधुनिक सोयी, घरचे जेवण आणि आदरातिथ्य अनुभवून.
सुख म्हणजे आणखी काय असतं? 👏🏻👏🏻😊

‘माहेर ‘ नाव सार्थक झाल्याचा उत्कृष्ट अनुभव . उत्कृष्ट आदरातिथ्य , स्वच्छता , टापटिप , वक्तशीरपणाचेच माहेर .
माझ्या गावच्या घरी आल्याचा जिवंत अनुभव . खरोखरच ‘ माहेर ‘ गावाकडंच घर ……. नेहमी ओढ लावणार.
२२-०५-२०२२

“माहेर ” शब्द साजेसा
ताम्हनकर काका काकू जातीने प्रत्येक गोष्टीची विचारपूस करतात. काय हवं नको सतत विचारले जाते. निसर्गाच्या रम्य वातावरणात वसलेला हा बंगला फारच सुरेख आहे. खोल्यांची रचना तिथल्या वस्तु, गरम थंड पाण्याची सोय , आपुलकीने विचारण्यात येणारी प्रत्येक गोष्ट , पाहुणचार बधून मन प्रसन्न झाले. खरतर पाहुणचार हा पाहुण्यांचा केला जातो. परंतू इथे आपुलकी मिळाली. अतीशय सुंदर अनुभव , पुन्हा येण्यासाठी आणि इतरांना “नक्की जा ” असं आवजून सांगण्यासाठी उत्सुक

नावाप्रमाणेच आम्ही सर्वांनी माहेरपण अनुभवले. स्वच्छता , टापटीप , निटनेटकेपणा , वक्तशीरपणा , आणि उत्तम आदरातिथ्याने खूप सखावून गेलो. आपल्या आवडीनुसार तयार केले जाणारे स्वयंपाकातील विविध पदार्थ हे येथील आगळे वेगळे वैशिष्ट्य.
श्री व सौ ताम्हनकर काका काकूंना उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि आमच्यासारख्या अनेकांना माहेरपण अनुभवायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आम्ही पुन्हा येऊ , पुन्हा येऊ , पुन्हा येऊ
हे नक्की.

नाव सार्थ करणारा अनुभव.
शब्दात वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेऊनच बघावा.

माहेरयेथे आल्यावर गावातील आपल्याच घरी आल्यासारखे वाटले. आमच्या वडिलांचा वाढदिवस अगदी घरच्यासारखाच साजरा झाला. घरगुती महाराष्ट्रिय पद् धतीने काका आणि काकूंनी थोड्याच वेळात औक्षणाची आणि गोड जेवणाची तयारी केली. हा पपांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरला.
सर्व जेवण आणि न्याहार्या खुपच रुचकर होत्या.
तुम्हा दोघांनाही खुप खूप शुभेच्छा.
आम्ही पुन्हा भेटूच.
२४-०५-२०२२

माहेरी जाणे हे दिवसेंदिवस कमी होत चालले असताना , Ladiesच नाही तर आम्हा पुरुषांनापण प्रेमाचा आणि आपुलकीचा अनुभव दिल्याबद्दल ताम्हणकर साहेब व शरयू वहिनी तुम्हा दोघांना मनापासून धन्यवाद.
इथे यायचे बरार्याच दिवसांपासून जमले नव्हते.
काल अचानक येऊन थडकलो तरीदेखील जो माहेरवास आम्ही सगळ्यांनी उपभोगला , खरेच धन्य झालो.
शरयूवहिनी आणि ताम्हनकर साहेबांना खुप खूप शुभेच्छा.
०९-०५-२०२२

आई वडील गेल्यानंतर माहेर जवळजवळ संपलच होत. त्या माहेरची उणीव तुम्ही खरोखरच भरुन काढताय.
मनसोक्त फिरण , चविष्ट पदार्थ , भरपूर विश्रांती , आणि स्वयंपाकाला सुट्टी आणि ताम्हनकर काकांचे मनापासूनच बोलण , खरोखरच माहेर नाव सार्थक आहे.
‘शून्य कचरा ‘ concept खूप आवडली. जितक जमेल तितक करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत.
निसर्गाचं सानिध्य आणि सागराचा सहवास माहेरमध्ये मिळाल्याने सोने पे सुहागा.
तुम्हा दोघांना आणि माहेरला खुप खूप शुभेच्छा.

लग्न झालेली मुलगी प्रथम माहेरी इल्यावर आई , वडील , भाऊ , बहिण तिचे ज्याप्रकारे
आदरातिथ्य करतात तोच अनुभव आम्हाला माहेरमध्ये आला. रोज नवनवीन रुचकर पदार्थांची रेलचेल होती. माहेर हे नाव सार्थ आहे. ताम्हनकर पती-पत्नीना आमच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. आम्ही केलेल्या दोन सुचना ते नक्की अमलात आणतील.

आजकाल माहेर फार क्वचित अनुभवायला मिळते म्हणजे आपल्या आवडीचे खायला मिळणे , मनसोक्त भटकणे , झोपा काढणे , तलावात डुंबणे , हे सगळं मिळण अवघडच झालय . पण इथे सासवण्याला अलिबाग जवळ अगदी नावाप्रमाणे माहेर अनुभवलं.
हो , आणा फक्त मी नाही तर माझा भाऊ , मुलगा आणा नातू सुद्धा येथील माहेरच्या प्रेमात नाहून निघालो. ताम्हनकर पती पत्नी यांना याचे सराव श्रेयआहे . त्यांच्याशी मनसोक्त गप्पाही झाल्या. नवनवीन वस्तु कशा करायच्या आणि कचर्यातून कला शिकायला मिळाली.
जेवणातील पदार्थ ह्याची खूप रेलचेल होती. सर्व पदार्थ उत्तम आणि बरोबर आपुलकी.
माहेर हे नाव खरोखर सार्थ आहे.

Excellent arrangementfor stay and food . Mr. & Mrs Tamhankar and their staff served us very well.
May their business grow further
Mrs. Shubhangi Bhave