Submit Your Reviews

Required

Customer Reviews

Have connected already not to go down completely upheld his promise company commander

Tomer G Armann

Have connected already not to go down completely upheld his promise company commander

Tomer G Armann

I m happy with sandbags Come on one exists to go nuts men didn t know everything without

Leul Rizzo Rodriguez

I m happy with sandbags Come on one exists to go nuts men didn t know everything without

Leul Rizzo Rodriguez

And it Scattered around him on the peaceful life All

Katence Denine

And it Scattered around him on the peaceful life All

Katence Denine

They were keeping the south The darkness if

Tamla Tuler

They were keeping the south The darkness if

Tamla Tuler

APC by our little pieces All the caterpillars is

Maika Holdsworth

APC by our little pieces All the caterpillars is

Maika Holdsworth

त्यांनी एवढी मोठी नियमांची यादी पाठवली
त्या म्हणाल्या हे चालणार नाही, ते चालणार नाही, आयत्या वेळी बदल चालणार नाहीत वगैरे वगैरे
एवढा मोठा ग्रुप असला की थोडे पुढे पाठी होतेच. मग त्यावरून नंतर वादविवाद नको म्हणून दुसरे बघितले
ज्यांना non veg खायचे त्यांना पण हे Resort गैरसोयीचे आहे.
तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो.
फक्त एक्स्ट्रा एक दिवसाचं जेवण सांगितलं तर डायरेक्ट बाराशे रुपये एका जेवणाचे वाढवले गेले.

Savi T

व्यवस्थापक शब्दाशी एकमत नाही…आम्ही 7 जण ठरलेलो पैसे ऊद्या द्या व दूस-या दिवशी 15 चा ग्रूप आला म्हणून आमचे कॅन्सल केले….हे योग्य नाही…प्रत्येक वेळेस 15 -15 येणार काय? आम्हांस त्यांचेसोबत काही प्रॉब्लेम नव्हता…मूड गेला…
सन्माननीय व्यवस्थापक शब्द पाळावा….अलिबाग मध्ये खूप रिसॉर्ट आहेत…पण…येथेच महाराष्ट्रीयन मागे पडतो…ठीक आहे..
कोणी येणार ठरविणार तेव्हा सावधान…

Asha Menkar

Yeah right before get away They want they

Ariany Lamelza

माहेर मध्ये आल्याआल्या सर्व ग्रुपचे उत्तम स्वागत आणि हळदी कुंकु झाले. व्हेज, नाॅनव्हेज जेवण, चहा नाश्ता खुपच छान झाला. अगदी माहेरी आल्यासारखे वाटले.
श्री व सौ ताम्हनकरांनी आमची खुपच छान बडदास्त ठेवली. आम्ही पुन्हा नक्कीच येउ. अनेक शुभेच्छा .

सौ. रोहिणी कृष्णा गरुड / सौ. कुंदा विकास बहिरट

पर्यटना सोबत च बलाचा पहिला वाढदिवस होता .ताम्हणकर काका काकू खूप कोऑपरेटीव्ह आणि अगदी खरच घराच्या माणसांसारखे अनुभव देतात . एक दिवस फार कमी वाटला . जेवण एकदम उत्कृष्ट . पुन्हा नक्की येवू .
जेवण कक्षातील बोर्ड एकदम परफेक्ट . मनाला भावतो .
रुही , हृषीकेश शैलेश शीतल वस्त
९७७३११३०६४
१२ ,१३ /०१/२०२५

रुही , हृषीकेश शैलेश शीतल वस्त

Thank you….is all what want to say from bottom of my heart. My feelings are busting with joy and happiness post my vist to Maher.
Wonderful place to visit with family, a complete stree buster ambience.
Energetic people like Kauthub Dada and Sharayu Vahini makes the stay feel like your own house and trust me having their company around is like a true blessing nothing like it.
My kids were so happy and had the real fun of spending time with family as place had so much give like the indoor games, nature, swimming pool, swing, plants, flowers, delicious home food etc everything was just perfect here. Absolutely clean and healthy place. Must visit it again and again is what I can say… Thank you🙏🙏🙏🙏

Harshada Prashant Kadam

अगदी माहेरी आलो असा अभास झाला. काका काकूंचा पाहुणचार मनाला खूप भावला.जेवण, स्वच्छ परिसर, अगदी घरी आल्याप्रमाणे सर्व कांही उत्कृष्ट.

Dr. Manali Khare Group - सौ.प्रेषिता व श्री विपुल मोडक ( 9004590640)

माहेरी आल्याचा अनुभव घेतला . नाश्ता ,जेवण अप्रतीम . अप्रतीम पाहुणचार . धन्यवाद . Garbage management & other Ideas are awesome. जीवनात कांही गोष्टी अशा असतात ज्या प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समाजात नाहीत . त्या साठी माहेरास प्रत्यक्ष भेट द्या .

उल्हास वैद्य (९८२१६०९१२२)/ हर्शल पेठे (९८७०७२३८०३ ) आणि परिवार (८)

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कांही निवांत क्षणांसाठी ” माहेर ” एक उत्तम पर्याय. अगदी नावाप्रमाणे चविष्ठ जेवण, प्रेमाने विचारपूस आणि नावांतपणा अगदी माहेर सारखा.

ईशा अजिंक्य मुळे 8275199168/ 7038270323 // स्नेहल अमोघ चिवटे 8275433404 / 9405170132 // केतकी आदित्य घाणेकर 8888417304/ 7350207832

निसर्गाच्या सानिध्यात २ दिवस खूप निवांत गेले. ताम्हनकर दांपत्यांचे आदरातिथ्य भारावून टाकणारे आहे. खाण्या-पिण्याची सोय घरच्यासारखी आहे. आम्ही येथे पुन्हा येवू आणि आप्तेष्ठांना सुद्धा सांगू.

विजय देशपांडे आणि कुटुंबीय (9765490027

माहेर हे ” एक गावाकडचे घर ‘ हे नाव एकदम सार्थकी आहे. काका काकूंची आपुलकी , काकूंनी मायेने बनवलेले आणि काकांनी त्याच लगबगीने आणि प्रेमाने वाढलेले जेवण एकदम लाजबाब. काका हे पिकलेल्या हापूस अंब्यासारखे तर काकू फिकलेल्या फणसासारख्या आहेत. खरचं इथे येऊन अगदी घरी आल्यासारखे वाटले. ति. काका काकूंना सा. नमस्कार.
मोहन चिटनीस आणि महादेव साळुंखे
9970172989
9860559044

मोहन चिटणीस + महादेव साळुंखे

🌹प्रिय सौ शरयू ताई आणि
श्री ताम्हणकर यांस..

उत्तम साधा सरळ उत्साही, संवेदनशील, चतुरस्र, हुशार, नेमस्त, व्यक्तिमत्व असलेला राजस सात्विक शरयू ताई व श्री काकांस…….
🌹 आपल्या माहेरच्या प्रांगणात
आपण दोघांनी अत्यंत अगत्याने आमचे स्वागत केले. अगदी बोर्डवर नामे लिहिण्या पासून अत्यंत छानश्या सर्व विषयावर गप्पा मारत
उत्तम चवीचे पदार्थ, आग्रहाने आणि प्रेमाने आम्हाला खाऊ घातलेत…खरंच कोणतीही कमतरता .. भासली नाही ..अगदी माहेरी आल्यासारखेच वाटले..
मस्त मजेत दोन दिवस कसे सरले कळले नाही….

🌹असतात अशीच तुमच्यासारखी
जीव लावणारी गोड वेडी
माणसे…….

🌹 जी निष्ठेने नेमस्त पणे मैत्रीची
नाती जपत असतात …..
त्यामुळे ती सर्वाना
हवीहवीशी वाटतात

🌹फुले शब्दांची नेमस्त रोखुन
हसून सर्वनाच आपलस करतात

🌹रिमझिम पाऊस सरी सारखा
मनाला सुखद मनोहर गारवा
देतात

🌹गोड शब्दांचा शेला पांघरुन
मर्याद प्रेमाने मित्रत्वाच्या
नात्यांची रेशीमगाठ जपतात्

🌹मन गाभाऱ्यातील सुंदर
विचारानी शब्दांच्या संस्काराचा
गंध दरवळतात

🌹सद्गुणांचा योग्य वापर करत
माणुसकीच्या प्रवाहात झोकून
देत सत्कर्म करत असतात

🌹म्हणुन तर तुमच्यासारखी गोड….
माणसे सर्वाना हवीहवीशी
वाटतात

🌹तुम्हा दोघांना….उत्तम..
वैभवदायी. आनंददायी. आरोग्यदायी समाधानी उदंड चिरंतन आयुष्य लाभो, वृद्धिंगत होवो ही ईश्वरास मन:पुर्वक प्रार्थना…

*जीवेत शरद: शतम*

*शुभम भवतु*

सौ नंदिनी समस्त मैत्रिणी
08.02.2024

सुरेखा श्री. जोशी , विभा पोंक्षे ,नलिनी नागपुरे , नंदिनी देशपांडे

Aspiring for visit

Veena Vilas Ghevde

श्री व सौ. कौस्तुभ ताम्हनकर यांनी प्रस्थापित केलेल्या अलिबाग (सासवणे) परिसरात असलेले ठुमकेदार ” माहेर ” म्हणजे एक जिव्हाळा, आणि आत्मीयतेचे उत्तम उदाहरण आहे. प्रसन्न व्यक्तीमत्व आणि सेवाभावी वृत्ती ही मनात घर करुन राहते. स्वच्छ व सुटसुटीत खोल्या या ” माहेर व्हीलाची ” शान वाढवतात.
हौशीने व प्रेमाने , आग्रहपूर्वक केलेल्या उपहारापासून रात्री जेवणापर्यंत केलेला पाहुणचार हे खरोखरच आपल्यासारख्या भगिनींना ” माहेरचीच ” आठवण करुन देते. जड अंत:करणाने पाउले निघालीतरी पुन्हा ” माहेरचीच ” आठवण मनात कायम राहणार
शूभदा छत्रे.
9222213280
बोरिवली.

शुभदा छत्रे

शरयू वहिनी कौस्तुभभाऊजी ,
‘गावाकडचं घर ‘माहेर’
खर तर मी प्रेमातच पडले माहेरच्या..
सुरवातच ,प्रसन्न रंगसंगतीचे फाटक ,अंगणातल्या टाईल्स, व “माहेर”गावाकडच घर.या अक्षरांनी ,आपलेपणाच्या गोष्टीने झाली..आल्या आल्या हातात कोकम सरबत , ताटे मांडलेलं टेबल..मऊसूत मोदक ,चविष्ट भाज्या ,व प्रेमळ आग्रह..हेच तर माहेर…चविष्ट पालेभाज्या, पातळ भाकरी, मऊ ,ऊन खिचडी,वर तुपाची धार,कढी..आम्रखंड पुरी,खमंग भाजणी वडे, व आंबोळ्या,Icecreme व गाजर हलवा, सगळ्याची चव अजून रेंगाळली आहे…
तुम्ही माहेरची रचना अतिशय thoughtfully l repeat thoughtfully, केलेली आहे हे लक्षात येत. स्वच्छता पाहाण्यासारखी आहे.त्याबद्दल तुमचे कौतुक …करावे वाटते.
शरयू तुझ्या हाताला चव आहे.तुझे एकंदर planning,,management skill, व बोलण्याची हातोटी,व कौस्तुभ भाऊजींचा 101tive support वारंवार लक्षात येत होता..
हा रथ तुम्ही स्वतःकरिता ,स्वतःच्या आनंदाकरिता व थोडी समाजसेवा म्हणून चालवत आहात..keep itup….
आमचे दोन दिवस,माहेरच्या माहेरपणात ,तुमच्याशी गप्पा मारण्यात आनंदात व मस्त गेले..
“माहेर” ,गावकडचे घर, कुणालाही व मलाही परत यावेसे वाटेल असे आहे हे खात्रीपूर्वक सांगते.

Swati Shrikant Gadre

माहेर मधील स्वगत , आदरातिथ्य , जेवण , सर्व कांही अगदी खूप छान आहे.

Anuradha Sawargave

माहेरमध्ये स्वागत आदरातिथ्य याचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतील. अविस्मरणीय चविष्ट भोजन आणि अल्पोपाहार यांचा आग्रह प्रेमपूर्वक असतो.
त्यामुळे परतपरत यावेसे वाटणारे हे ठिकाण आहे.

Dilip Barve , Deokule and Patale

‘ माहेर ‘ शब्द सार्थ करणार ठिकाण – भावनिक , व्यवसायिक , आणि आहार विहाराच्या दृष्टीने , सर्वच बाजूंनी पुरूषांनाहीमाहेरचा अनुभव देणारी जागा. कचरा आणि आहार विहार याबद्दल वेगळा विचार देणार ठिकाण.
” जे जे उत्तम उदात्त उन्मत महन्मधुर ते ते ” सर्व इथे मिळते.
अधिक अधिक प्रगती साठी आणि अनेक जणांपर्यंत पोहोचण्यासाठी
खूप खुप शुभेच्छा
डाॅ. मुकुंद करंबेळकर
९८२२२६३२७९

Dr. Mukund Karambelkar + 13

सगळे खूष झाले तुमचा बंगला, स्वच्छता, नीटनेटकेपणा, आधुनिक सोयी, घरचे जेवण आणि आदरातिथ्य अनुभवून.
सुख म्हणजे आणखी काय असतं? 👏🏻👏🏻😊

Gokhale Sima Suhas

‘माहेर ‘ नाव सार्थक झाल्याचा उत्कृष्ट अनुभव . उत्कृष्ट आदरातिथ्य , स्वच्छता , टापटिप , वक्तशीरपणाचेच माहेर .
माझ्या गावच्या घरी आल्याचा जिवंत अनुभव . खरोखरच ‘ माहेर ‘ गावाकडंच घर ……. नेहमी ओढ लावणार.
२२-०५-२०२२

मधुकर वासुदेव रसाळ 9867398799

“माहेर ” शब्द साजेसा
ताम्हनकर काका काकू जातीने प्रत्येक गोष्टीची विचारपूस करतात. काय हवं नको सतत विचारले जाते. निसर्गाच्या रम्य वातावरणात वसलेला हा बंगला फारच सुरेख आहे. खोल्यांची रचना तिथल्या वस्तु, गरम थंड पाण्याची सोय , आपुलकीने विचारण्यात येणारी प्रत्येक गोष्ट , पाहुणचार बधून मन प्रसन्न झाले. खरतर पाहुणचार हा पाहुण्यांचा केला जातो. परंतू इथे आपुलकी मिळाली. अतीशय सुंदर अनुभव , पुन्हा येण्यासाठी आणि इतरांना “नक्की जा ” असं आवजून सांगण्यासाठी उत्सुक

सौ. समिधाउदय कानिटकर --9321616455

नावाप्रमाणेच आम्ही सर्वांनी माहेरपण अनुभवले. स्वच्छता , टापटीप , निटनेटकेपणा , वक्तशीरपणा , आणि उत्तम आदरातिथ्याने खूप सखावून गेलो. आपल्या आवडीनुसार तयार केले जाणारे स्वयंपाकातील विविध पदार्थ हे येथील आगळे वेगळे वैशिष्ट्य.
श्री व सौ ताम्हनकर काका काकूंना उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि आमच्यासारख्या अनेकांना माहेरपण अनुभवायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आम्ही पुन्हा येऊ , पुन्हा येऊ , पुन्हा येऊ
हे नक्की.

श्री व सौ. विणा गोरे -9833930583 / 9987818582

नाव सार्थ करणारा अनुभव.
शब्दात वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेऊनच बघावा.

डाॅ श्रीनिवास दातार - 9920331801

माहेरयेथे आल्यावर गावातील आपल्याच घरी आल्यासारखे वाटले. आमच्या वडिलांचा वाढदिवस अगदी घरच्यासारखाच साजरा झाला. घरगुती महाराष्ट्रिय पद् धतीने काका आणि काकूंनी थोड्याच वेळात औक्षणाची आणि गोड जेवणाची तयारी केली. हा पपांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरला.
सर्व जेवण आणि न्याहार्‍या खुपच रुचकर होत्या.
तुम्हा दोघांनाही खुप खूप शुभेच्छा.
आम्ही पुन्हा भेटूच.
२४-०५-२०२२

सौ. प्रियांका निलेश सावंत -9769749908

माहेरी जाणे हे दिवसेंदिवस कमी होत चालले असताना , Ladiesच नाही तर आम्हा पुरुषांनापण प्रेमाचा आणि आपुलकीचा अनुभव दिल्याबद्दल ताम्हणकर साहेब व शरयू वहिनी तुम्हा दोघांना मनापासून धन्यवाद.
इथे यायचे बरार्‍याच दिवसांपासून जमले नव्हते.
काल अचानक येऊन थडकलो तरीदेखील जो माहेरवास आम्ही सगळ्यांनी उपभोगला , खरेच धन्य झालो.
शरयूवहिनी आणि ताम्हनकर साहेबांना खुप खूप शुभेच्छा.
०९-०५-२०२२

सौ हेमलता , भालचंद्र फडके ठाणे

आई वडील गेल्यानंतर माहेर जवळजवळ संपलच होत. त्या माहेरची उणीव तुम्ही खरोखरच भरुन काढताय.
मनसोक्त फिरण , चविष्ट पदार्थ , भरपूर विश्रांती , आणि स्वयंपाकाला सुट्टी आणि ताम्हनकर काकांचे मनापासूनच बोलण , खरोखरच माहेर नाव सार्थक आहे.
‘शून्य कचरा ‘ concept खूप आवडली. जितक जमेल तितक करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत.
निसर्गाचं सानिध्य आणि सागराचा सहवास माहेरमध्ये मिळाल्याने सोने पे सुहागा.
तुम्हा दोघांना आणि माहेरला खुप खूप शुभेच्छा.

सौ. अंजली , प्रशांत नांदे ठाणे

लग्न झालेली मुलगी प्रथम माहेरी इल्यावर आई , वडील , भाऊ , बहिण तिचे ज्याप्रकारे
आदरातिथ्य करतात तोच अनुभव आम्हाला माहेरमध्ये आला. रोज नवनवीन रुचकर पदार्थांची रेलचेल होती. माहेर हे नाव सार्थ आहे. ताम्हनकर पती-पत्नीना आमच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. आम्ही केलेल्या दोन सुचना ते नक्की अमलात आणतील.

श्रीकांत चोळकर , पुणे

आजकाल माहेर फार क्वचित अनुभवायला मिळते म्हणजे आपल्या आवडीचे खायला मिळणे , मनसोक्त भटकणे , झोपा काढणे , तलावात डुंबणे , हे सगळं मिळण अवघडच झालय . पण इथे सासवण्याला अलिबाग जवळ अगदी नावाप्रमाणे माहेर अनुभवलं.
हो , आणा फक्त मी नाही तर माझा भाऊ , मुलगा आणा नातू सुद्धा येथील माहेरच्या प्रेमात नाहून निघालो. ताम्हनकर पती पत्नी यांना याचे सराव श्रेयआहे . त्यांच्याशी मनसोक्त गप्पाही झाल्या. नवनवीन वस्तु कशा करायच्या आणि कचर्‍यातून कला शिकायला मिळाली.

निरुपमा चितळे , पुणे

जेवणातील पदार्थ ह्याची खूप रेलचेल होती. सर्व पदार्थ उत्तम आणि बरोबर आपुलकी.
माहेर हे नाव खरोखर सार्थ आहे.

सौ. अर्चना , उल्हास पिंगळे पुणे

Excellent arrangementfor stay and food . Mr. & Mrs Tamhankar and their staff served us very well.
May their business grow further
Mrs. Shubhangi Bhave

भावे , भागवत , देशपांडे , कारखानिस

“माहेर ” दुसरे
माहेरच्याच भावंडांसहित लाॅकडाउन नंतर छानपैकी दुसर्‍या माहेरी आलो!
वाफाळलेल्या चहा पासून ते चविष्ट आणि गरमागरमआवडीचे जेवण , मुख्य म्हणजे अगदी वेळेवर आणि आयते , उत्तम झोपायची सोय, स्वच्छ आणि टापटीप सर्वच जागा आणि पोटभर गप्पा. खर म्हणजे दोन दिवस कमीच पडले.
सौ. संध्या देशपांडे.
१३-०३-२२
दोन दिवस खूपच मजेत गेले. माहेरापेक्षा जास्त माहेरपण. संध्याने आमच्या सर्वांच्या मनातले लिहिले आहे
अल्पना ताटके
‘अतिथी देवो भव ‘ चा सर्वस्व अर्थ अनुभवला.
Ashwin Moghe

फणसळकर , प्रभुदेसाई , भोरकर , भट्टाचार्जी , मोघे , ताटके , देशपांडे , महाजनी

अतिशय सुंदर असा अनुभव. शिस्तप्रिय, पद्धतशीर , टापटीप व्यवस्था.
सर्व समावेशक -पालक आणि बालक दोघांच्या सोयी उत्तम.
प्रसाद शिंत्रे
१३-०३-२२
माहेर – गावाकडच घर – हा एक सुंदर अनुभव होता. स्वच्छता आणि निटनेटकेपणा यांचा इथे एक सुंदर मेळ आहे. जेवण आणि नाष्टा अतिशय छान होत. काका काकूंचे आभार
राजेंद्र विजय कापरेकर
चौक , खालापूर , रायगड
अतिशय उत्तम असे निवास स्थान, जेवणात रुचकर पदार्थ , निसर्ग सौंदर्याने नटलेले , सागर किनारी असणारे ठिकाण . समाधान वाटले. सर्व व्यवस्था उत्तम दर्जाच्या, माहेर नाव सार्थ करणारे आहे.
जयन्त काळे.
वहिनी आणि काकांचे आदरातिथ्य खुपच छान . माहेरी आल्यासारखे खरच वाटल. अन्नपूर्णा त्यांना अशीच साथ देवो हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.
सौ. माधुरी काळे.

शिंत्रे , कापरेकर ,काळे , प्रभूदेसाई

स्वच्छता , जेवण , आपुलकी , सोयी – सुविधा सर्व बाबतीत अतीशय ऊत्तम. खराखुरा माहेरचा अनुभव
अनूष्का मोडक
9930002312

काटकर , गणफुले , मोडक - ५-७/०५/२२

Overrated and overpriced

Madhura Sheth

‘ माहेर ‘ खराखुरा माहेरचा अनुभव . हवा , पाणी ‘ प्रशस्त खोल्या ,स्वच्छता , निटनेटके व्यवस्थापन – सर्व कोतुकास्पद ! जेवण नाष्ट्यातील पदार्थ सर्व रुचकर आणि चविष्ट ! श्री व सौ ताम्हनकरांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन !

दाते , खाडिलकर दातार , गद्रे , आपटे , गोखले गोखले , बापट , जोशी बाम , दांडेकर

‘ माहेर ‘ हे आमचंच दुसरं घर आहे . पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटते काका काकूंचे अगत्य , मस्त बांगला , शांत गाव , जवळ समुद्र . अप्रतीम
सान्वी , प्रियांका , रोहन , शिल्पा आणि विजय देवधर – ९८२१४६१९९०.

विजय देवधर - ९८२१४६१९९०.

‘ माहेर ‘ हे नाव फक्त सासुरवाशिणींसाठीच असावे अशी आमची समजूत होती पण इथे आल्यावर लक्षात आले हे तर सर्व पर्तकांचे महेर आहे . आम्ही आलो तेंव्हा सगळ्यात पहिले आमचे गेटवर स्वागत झाले ते सुद्धा गॉड तिळगुळाने . आम्ही जेंव्हा रूम मध्ये गेलॊ तेंव्हा प्रसन्न वाटले . सर्वात महत्वाचे म्हणजे इथली स्वच्छता . . रुम ची अरेंजमेंट . जेवण तर अप्रतिम होते . सर्व अमिनिटीज पण होत्या उदा. टेबल टेनिस , कॅरम , सापशिडी , चेस , साऊंड सिस्टीम , ब्याट बोल , सायकली , ब्याडबिंटन , बास्केट बॉल , गोट्या , भवरे , . आम्ही नक्की पुन्हा इथे येणार .
जगदीश पुथरन- ९२२५१२६८११

जगदीश पुथरन- ९२२५१२६८११

‘ माहेर ‘ गावाकडचं घर ,हे अतिशय सुंदर असे ठिकाण आहे . आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला . इथली सर्व माणसे अतिशय प्रेमं आणि शिस्तप्रिय आहेत . त्यात काका काकू अतिशय प्रेमळ आहेत . त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम लाभो हीच सदिच्छा .
केंगे काळे देशपांडे जोशी जोशी आणि अध्यापक – नाशिक

डॉ . प्रवीण केंगे -९४२२२८३८१७

‘ माहेर ‘ गावाकडचं घर ,हे नाव सार्थ करणारी वास्तू आणि घरातील माणसं आहेत . परत परत यावेसे वाटणारे हे ठिकाण आहे . आम्हाला सगळ्यांना इथे येऊन खूप आनंद झाला . बरोबर बराच कांही घेऊन जात आहे . पुढचे कांही दिवस इथल्या आठवणीत असेच छान जातील . ताम्हनकर काका काकू आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा . त्यांना चांगले आयुरोग्य लाभो हीच प्रार्थना .
जोशी,मोरे कात्रे नाईक

Digambar Joshi

फारच सुंदर स्टे झाला. मित्रासमवेत वेळ चांगला गेला. कौस्तुभ आणि मी इयत्ता ५वी पासूनचे मित्र. काटेकोरपणे सर्व सोई करून ठेवल्या आहेत. जेवण उत्तम. आभार कोस्तुभ आणि वहिनी.

Jayant Gajanan Kulkarni 9011033635

सुरेख माहेरपण, आम्ही सगळे छान रिल्याक्स झालो. गप्पाष्टक रंगल्याने बहार आली. श्रीव सौ ताम्हनकर उत्तम महेमाननवाजी करतात.

श्री व सौ मराठे जोशी नित्सुरे 9820550905

Excellent experience , Good food, Excellent cleanliness, Good hospitality.

श्री संजय मंगळूरकर -9822324146

आम्ही आलेल्या पाचजणींना खरोखर माहेरपणाला आलो असे जाणवले. very good experiance and food is testy.
माहेरपणाला नक्की येणार आणि आईच्या फूडची चवचाखणार !!!
All the best Kaka Kaku. for all service and love you are sharing.

मोहिनी गव्हाळे बोरकर कोटस्थाने - ९६६४६३६४७७

Maheris a nice place to visit. The place is very nice and clean. Hospitality is very nice . Food test and verity is very nice In future we will visit again. पुन्हा पुन्हा यायला नक्की आवडेल. अतिशय छान आदरातिथ्य, चवदार भोजन . “माहेर” नावाला साजेसे.
बाईच्या माहेरपणाला असणारा जिव्हाळा प्रेम आपलेपणा पदार्थात आणि वागण्यात असल्यामुळे परत परत यावेसे वाटणारे “माहेर – सासवणे ” खूपच मस्त.

सौ. स्मिता बाम - 9657049651

माहेरमध्ये आल्यावर आम्हाला खरोखरच माहेरी आल्यासारखे वाटले.काका काकू खूप सहकार्य करणारे आहेत. काकूंच्या हातची जेवणाची चव उत्तम आणि चविष्ट आहे. विशेषत: No Garbage मोहीम आणि maximum eco friendly गोष्टींचा वापर ह्या गोष्टी सगळ्यांनी येथून घेऊन जाण्यासारख्या आहेत. हा उपक्रम अतीशय स्तुत्य वाटला. स्वच्छता आणि सुव्यवस्था यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा माहेरी येऊ.

अक्षय कुलकर्णी - 9869479702

माहेरमध्ये आल्यावर आम्हाला खरोखरच माहेरी आल्यासारखे वाटले.काका काकू खूप सहकार्य करणारे आहेत. काकूंच्या हातची जेवणाची चव उत्तम आणि चविष्ट आहे. विशेषत: No Garbage मोहीम आणि maximum eco friendly गोष्टींचा वापर ह्या गोष्टी सगळ्यांनी येथून घेऊन जाण्यासारख्या आहेत. हा उपक्रम अतीशय स्तुत्य वाटला. स्वच्छता आणि सुव्यवस्था यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा माहेरी येऊ.

अक्षय कुलकर्णी - 9869479702

करोनाकाळात घरी बसून कंटाळलेल्या आम्ही मैत्रीणींनी एका मैत्रीणीच्या सांगण्यावरून अलिबाग जवळ ससावणे गांवात “माहेर” रिसाॕर्टला जाऊन धम्माल करायची असे ठरवले.
अलिबाग जवळ सासवणे मधे “माहेर” समोर गाडी थांबली. रिसाॕर्टचे मालक श्री. ताम्हनकर स्वतः स्वागताला पुढे आले.
सुंदर बंगला, सुंदर बाग. बाहेर माहेरची माहिती देणारा बोर्ड,इथे कचरा तयार होत नाही, हे वाक्य लक्ष वेधून घेत होते. दुसर्या बोर्डवर, सुस्वागतम्, आमच्या सर्वांची नांवे, पुढे माहेरवाशी व्हा. छान वाटलं. आत व्हरांड्यात सौ. ताम्हनकर, म्हणजे शरयूवहिनी आणि त्यांच्या वहिनींनी स्वागत केलं. शरयूवहिनींचं व्यक्तीमत्व हसरं, प्रसन्न. भिं
तीवर केलेलं पेंटींग, स्प्राईटच्या बाटल्यांच्या दिव्याच्या शेडस् आणि प्रचंड स्वच्छता लक्ष वेधून घेत होती.
शरयूवहिनींनी वर जाऊन फ्रेश व्हा म्हणून सांगितले .अर्ध्या जिन्यात चपलांचा मोठा स्टँड. चपला स्टँडला ठेऊन वर गेलो. वरच्या मजल्यावर मोठ्ठा ओपन हाॕल, त्याला छानशी बाल्कनी, हाॕलमधे दोन सोफे , पाण्याचं पिंप असलेलं टेबल आणि कॕरम बोर्ड. बाकी हाॕल मस्त रिकामा. बसा, गप्पा मारा, बैठे खेळ खेळा.
ह्या मजल्यावर चार बेडच्या तीन रुमस् आहेत आणि एक मोठा हाॕल.वरच्या मजल्यावर अजून एक रौम आहे. आम्ही तेराजणी होतो. आम्हाला हाॕल दिला होता. ओळीने आठ, दहा बेड, दोन भले मोठे सोफा कम बेड, भरपूर खुर्चा. एक इंडियन, एक वेस्टर्न टाॕयलेट, कपडे बदलायला छोटीशी खोली, महत्वाच्या गोष्टी ठेवायला कपाट. बेडवर पांढर्या स्वच्छ, एम्ब्राॕयडरी केलेल्या नाहीतर पेंटींग केलेल्या चादरी, उषांचे अभ्रे.
वहिनी घरच्या लिंबाचे सुंदर सरबत घेऊन आल्या. आम्हाला उशीर झाल्याने नाष्ता इथे न घेता आम्ही रस्त्यातच घेतला होता. शरयू वहिनी, बोलक्या, मनमोकळ्या आणि स्पष्ट. जसे लोक पुणेकरांना आवडतात तशा.
फ्रेश होऊन जेट्टीवर गेलो. मुंबईहून गाड्यांसकट लोकांना घेऊन येणारी प्रचंड रोरो पाहिली. येताना अप्रतिम करमरकर शिल्पालय पाहिले.
परतेपर्यंत जेवायची वेळ झाली. हातपाय धुवून जेवायला आलो. माहेरला शाकाहारी व सामिष दोन्ही जेवणे मिळू शकतात. दोन्हीची स्वैपाकघरे वेगळी आहेत. मागच्या व्हरांडा कम हाॕलमधे मोठी मोठी तीन चार डायनिंग टेबल जोडून एका वेळी पंधरा वीस माणसांची जेवायची सोय. स्वच्छ थाळे, वाट्या गलास, चमचा प्रत्येक खुर्चीपुढे. गरमगरम पोळ्या, बिरड्याची उसळ, शिमला मिरचीची भाजी, कोशिंबीर, मिरगुंड, तीन प्रकारची लोणची, लसूणचटणी, आळूवडी, घरी गहू कांडून केलेली खीर, भात, आमटी, ताक असे सुग्रास, सात्विक जेवण झाले.दोन्ही वहिनी स्वतः लक्ष देऊन हवेनको बघत होत्या.
ह्या जेवणाच्या व्हरांड्याच्या मागे सुंदर बाग व स्विमिंग पूल आहे.
जेवण करून काहीजणी लवंडल्या, कोणी गप्पा मारल्या, काही कॕरम खेळल्या. तसही फार फिरण्यातकोणाला स्वारस्य नव्हते. चार, साडेचारला चहा आला. चहाबरोबर आमच्या वया प्रमाणे मारी आणि डायजेस्टीव बिस्कीटांचे पुडे.
आवरून खाली आलो. आम्हाला कडवे वाल पाहिजेत म्हणून आधीच सांगितले होते. सुंदर क्वालुटीचे वाल विकत मिळाले. तसेच छान मोठ्या पिशव्या, सोलापूरची मऊ ,हलकी पांघरुणे, मला वाटतं त्याला दुतेरी म्हणतात, विकायला होती. खरेदी झाली. इथे ओल्या कचर्याचे खत करण्याचे मशीनही बनवून मिळते. त्याची माहिती श्री. ताम्हनकरांनी दिली. आता निघायची वेळ झाली. आपण एक रात्र राहायला का आलो नाही, अशी सगळ्यांना हुरहुर लागली.
आम्हाला सर्वांना वहिनींनी माहेरचा प्रेमाचाआहेर दिला. त्यात शून्य कचर्याची माहिती देणारे पुस्तक व खताच्या मशीनची माहिती देणारे पॕम्प्लेट आहे.
आजपर्यंत अनेक रिसाॕर्ट पाहिली. पण इतके स्वच्छ, आपुलकीने भरलेले, खरोखरी माहैरीच आलोय असे लाड करणारे माहेर, परत परत जावेसे वाटण्यासारखे आहे.
जरूर भेट द्या.

विशाखा टिपणीस.
पुणे.

सुरेखा काणे समूह -पु.ल. देशपांडे समूह- टिपणिसस

जेवण , वातावरण , , काकू – काकांचा स्वभाव – अप्रतीम .. नवांतपणा आणि प्रेमळ स्वभाव आपुलकीने मन खुष झाले . सर्वानी एकत्र येऊन माहेरपण अनुभवायला पुन्हा पुन्हा यावे अशी इच्छा

कुलकर्णी आणि पारगावकर

Pendamic / Lockdown च्या तणावपूर्ण वातावरणातून बाहेर पडण्याची नितांत आवश्यकता होती . आमच्या सर्व समूहाला इथे येऊन खूपच मजा आली .
ताम्हनकर दांपत्याचे आदरातिथ्य अगदी घरच्यासारखे वाटते . जिभेचे सर्व चोचले अगदी सामिष आहारासकट आनंदाने त्यांनी पुरवले . ताम्हनकर दांपत्याचे मन:पूर्वक आभार .

नेवाळकर , पितळे , वाघोलीकर , खारगे आणि सैगल

माहेर .. गावाकडचे घर
उत्तम पाहुणचार
स्वागतापासून निरोपापर्यंत कौटुंबिक काळजी घेऊन सगळ्यांचे माहेरपण करणारे . खूप आवडले . पुन्हा येऊ .
अतिशय अवर्णनीय अनुभव .

जोग (५) केतकर (३) नानिवडेकर (३) कुमाटगी (३) फडके (१)

अवर्णनीय या शब्दाची अनुभूती आली . हा शब्द ऐकला होता आज तो प्रत्यक्ष अनुभवला . काका आणि काकू यांचा उत्साह आणि ऊर्जा बघून स्वतःला वेगळा धडा मिळाला . या बद्दल त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन . ” शून्य कचरा ” हा वैश्र्विक परिपाठ त्यांनी प्रत्यक्षात साकारला आहे . . शतांश: प्रणाम .
श्री काका काकू आपणास निरोगी दीर्घायुष्य मिळावे आणि आपली भेट निरंतर व्हावी ही ईश्र्वरचरणी प्रार्थाना.
आम्हास श्री भावे यांनी येथे येण्यास सुचवले त्यांचे मनापासून आभार

श्री नरेंद्र अनंत सुर्लीकर - ९९६०७००२०३

खरंच माहेरी आल्यासारखे वाटले .सौर निरांजन खूप सुंदर ..काका काकू खूप उत्साही आणि छान स्वभावाचे . न सांगता मनकवड्याप्रमाणे काकूंनी आवडीचे पदार्थ करून घातले . काकू सुगरण आहेत

सौ . नीता नरेंद्र सुर्लीकर - ८६६९२३३६७२

जेवण उत्तम . खेळणी आणि Indoor Games मुळे मज्जा आली

राजस नरेंद्र सुर्लीकर – ९३२५९३८९७१

राजस नरेंद्र सुर्लीकर

प्रसन्न ,आपलेपणाचा आणि Eco Friendly अनुभव

आधिश गबाले -९९७०३०२९३९
श्रीधर पत्की – ९९२३७०४५५०
मैथिली चॅटर्जी – ८६००९९९८०७
मुग्धा पवार – ७५८८६८१३९४

आधिश गबाले -९९७०३०२९३९ श्रीधर पत्की - ९९२३७०४५५० मैथिली चॅटर्जी - ८६००९९९८०७ मुग्धा पवार - ७५८८६८१३९४

Clean & hygiene place, Awesome food with good taste. Clean & quiet place. Pool for family is nice & clean .

Narendra & Rashmi Tadpatrikar
9689881106
7769927544

Narendra & Rashmi -

Enjoyed stay , Excellent Garden , Swiming Pool , Delicious food , Clean Rooms

Jayant , Sujata Mulay – 9822761208 /
Mukund , Anagha Mulay
95636077618

Jayant , Sujata , Mukund , Anagha Mulay - 9822761208 / 95636077618

खेळण्यासाठी भरपूर जागा – माहेरची आठवण

अमित प्रज्ञा रामा मुळे – ८७८८२७७४६३

अमित प्रज्ञा रामा मुळे - ८७८८२७७४६३

स्वच्छ जागा , एकदम चविष्ट जेवण , सुटसुटीत प्रशस्त खोल्या , कचरा व्यवस्थापन – सर्व कांही छान

राहुल , सोनल , अर्जुन आरपार - ९४२२४९४२२७ अशोक , सविता विऱोळे

सौ . धनश्री केळकर माझी खूपच चॅन मैत्रीण आहे . तिच्यामुळे सासवण्यास यायचा योग्य आला . धनश्री , नील , हर्ष आणि ताम्हनकर काका काकूंबरोबर दोन दिवस आनंदात , निवांत आणि खूप मस्त गेले. जेवण तर खूपच चविष्ट , घरगुती पद्धतीचे , मनोसक्त आणि मस्त . . महेर – गावाकडचं घर – अप्रतिम अनुभव . खरंच माहेरी आल्यासारखे वाटले . ताम्हनकर काका काकू खूपच चॅन आणि गप्पिष्ट आहेत . परत येणार कायम आम्ही एवढं नक्की .

श्री नचिकेत , सौ भाग्यश्री दामले . ९४२०४२५५२९ / ९०२१७९०४४२ .

श्री नचिकेत , सौ भाग्यश्री दामले . ९४२०४२५५२९ / ९०२१७९०४४२

खूपच छान अनुभव . ताम्हनकर काका सतत हसतमुख , मदतीला तत्पर , आणि काकू म्हणजे साक्षात अन्नपूर्णा . परत येण्याचे नक्की करूनच आम्ही माहेरचा निरोप घेत आहोत . .

देवधर , ताम्हनकर आणि उकिडवे कुटुंबीय

आदरातिथ्य कसे असावे याचा उत्तम आदर्श म्हणजे ‘ महेर ‘ . याचे श्रेय श्री कौस्तुभ , सौ . शरयूताई , सौ अरुणाताई व त्यांचे सहकारी यांनाच आहे . दोन तीन दिवस खरोखर ‘ माहेर ‘ चा आनंद मिळाला .

Sou. Sucheta Sane -

स्त्रियांबरोबर पुरुषांना देखील त्यांचे हे महेर वाटते . प्रेम अगत्य भरपूर . पर्यावरण संवर्धनासाठी विशेष कार्य श्री कौस्तुभजी करत आहेत . उत्कृष्ट नाश्ता ,जेवण ,आणि एकूणच व्यवस्था . ग्रेट . अभिनंदन .

Sushilkumar Anand Hate - सुशीलकुमार आनंद हाटे -9820780089

It was a very fulfilling experiance…. Thank you Maher.

Amey Gharat-9769653355

Experianced a very good example of implementation of renewable energy from organic waste .

Pritam Shinde- 8879529527

माहेरमधील फुल, झाड , वास्तू , जेवण , नाश्ता सर्वच अतीशय आवडलं . खूप छान अनुभव होता . परत परत यायला आवडेल . सर्वांकडून पेम जिव्हाळा मिळाला . श्री ताम्हनकर काकांकडून कचरा व्यवस्थापनाबद्दल चांगलं मार्गदर्शन मिळालं .

Anagha Prakash Navarange- 9833904234

एक शांत अनुभव .

Archana , Shrikant Prabhudesai- 9821928684 , 7738665045

खूप छान . खरंच माहेरी आल्यासारखे वाटले .

Swati , Rajiv Prabhudesai-98192 19313 , 9819733973

अप्रतिम हा शब्द हि कमी पडेल असे माहेरपण मिळालं . परमेश्र्वर दोघांना उदंड आयुष्य देवो .

Rekha, Shamal Bhattacharjee- 9322691933 , 9819224537

Excellent,
उत्कृष्ट सोय , सुंदर जेवण , माहेरपण मिळालं .

Jyotsna, Ujwal Bhorkar-9892834964,9892844964

Maher is a wonderful place to disconnet from your daily hassels and to connect with friends and family.
Tamhankar were not just very good hosts but the personal touch added by Bandish and Prajakta made this trip really memorable. Maher feels like your second home where Kaku cooks delicious food and Kaka is a very worm host.
Thanks a lot for a great experience . Wounderful memories खरोखरच माहेरपण enjoy केलं .

Lele , Joshi , Tamhankar & Deodhar Family- 9820174989 / 9821600996

Very Good Stay.
Very good hospitality.
Perfect location closed to Saswane Beach.
Well maintenned and clean feels like home .
With great home food.

Mukul Shah and Family friends- 9833757208

रोजच्या दगदगीच्या आणि धकाधकीच्या जगण्याचा कंटाळा आला कि निवांतपणा हवाहवासा वाटू लागतो . अशावेळी हटकून आठवण येते आणि आपली पावले आपसूक माहेरची वाट पकडतात . .प्रत्येकाला जावेसे वाटेल आणि हवेहवेसे वाटेल असे हे हक्काचे माहेर – गावाकडचं घर आहे .
स्वच्छता , नीटनेटकेपणा आणि रसिकता यांचा त्रिवेणी संगम त्यात अगत्यशील माहेरची मायेची प्रेमळ माणसे येथे आपल्या सेवेसाठी तत्पर असतात .
पुन्हा पुन्हा यावेसे वाटावे असे हे ठिकाण आहे .
लवकरच पुन्हा भेटू या अशी इच्छा मनात ठेऊन शुभेच्छांसह निरोप घेत आहोत.

Panvel Friend Circle

Mr. and Mrs. Tamhankar were wonderful hosts.Maher is a beautiful homestay ferfect for weekend gathering. The hosts have made all the arrengements for a funfilled and memoreable weekend get together. The beach is just 5 minutes walk away. Healthy and home made food and the wormth way whichit is served makes it all the more worth visiting this plase again and again.

काकांनी उत्कृष्ट मच्छि arrange करून दिली त्याबद्दल स्पेशल थँक्स .

Prathamesh Namjoshi and friends-9819139452

स्वच्छ सुंदर ,मायेचे महेर , अप्रतिम अनुभव

सौ. मुळे मंदा चंद्रकांत - ९२२६२७९२७६

खरं सांगायचं तर अभिप्राय लिहिण्यासाठी शब्दच अपुरे पडतील माहेरची माया काका- काकूंचे प्रेमळ बोलणे यांनी भरून पावलो . स्वच्छता नीट नेटकेपणा याचे खूप कौतुक वाटले . दोघेही या वयात खूपच active आहेत . काकूंचा स्वयंपाक अप्रतिम आहे .

Dr. Mr. . and Mrs. Rahul Mulay -७३५०५ ८१३२८

Amezing good food .Sir Madam Very nice . Arrangement and woo food & breakfast. Wish you very best of Luck.
Mr. and Mrs Tamhankar both are so loving caring couple. No words I am speachless .Food was awesome . It is so clean and heginic . ekach word madhye sangayache manje ” Made for each other ”
” Love you my best friend Mrs. Tamhankar. Will visit at lease twice a year.

Shaila Sunil Kathote- 9967538540

माहेरी येऊन छान वाटले . मन प्रसन्न झाले . गावाकडच्या आणि कोकणच्या आठवणी घेऊन आम्ही पार्ट प्रवासाला निघालो . आभारी आहोत

सुरेश भोसले ९३७१५ ३९६०६

माहेरपण छान झाले . महेर भरलेले असून देखील आम्हाला शांतता मिळाली . ताजे तवाने होऊन परतत आहोत . पुन्हा नक्की येऊ .

गावडे आणि शेवाळे

खूप मजा आली .
Amazing Food , Beach nearby , Homely feeling . Will come back again .

आश्र्लेषा पंडित , ९८३३९ ९०८०१ मनाली बागुल ९८३३८ ११८३८

गावाकडच्या घराचा खराखुरा फील आला आणि मावशी काकांच्या मायेच्या ओलाव्याने त्याला अजूनच बहर आला . गावाकडच्या घरात दोन दिवस खरोखरचं जागून घेतल.
गावाकडच्या घराचा खराखुरा फील आला आणि मावशी काकांच्या मायेच्या ओलाव्याने त्याला अजूनच बहर आला . गावाकडच्या घरात दोन दिवस खरोखरचं जागून घेतल.
घंघाळे कुटुंबीय
नारायणगाव , कळवा
नारायणगाव , कळवा

घंघाळे कुटुंबीय-रवींद्र ,पुष्पा , योगेश , कल्पेश , सुप्रिया , श्रद्धा , अवनी , आंशिक , ईशानी

महेर – शून्य कचरा
अमर्याद आनंद आणि जिभेचे मनसोक्त चोचले . लावलेली पोपटी . तृप्त झालो . काकूंच्या सुग्रास जेवणाला तोड नाही .

मिलिंद कऱ्हाडे ९८६९२५३१००

Mr. Mrs . So Nice .
महेर खूपच सुंदर . आपले आदरातिथ्य प्रेमळ . बाबांना बघून वडिलांची तिव्रतेने आठवण झाली . परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे . आपण उभयतांना उदंड आयुष्य लाभो हि पांडुरंग चरणी प्रार्थना .

सौ रजनी ऐस .कोल्हे , शकुंतला रामदास देवडे , सौ. विमल कारभारी कोकणे .

मी सौ . सुहासिनी चाळके , मला माहेरी आल्यासारखे वाटले
पुणे
७०२०६८४४७९

सौ . सुहासिनी चाळके

माहेर या शब्दामध्येच सर्व आले आपण त्याचे जातं करत आहात .

विलास कदम पुणे ९९२२७७५६४७६

लेक जावयांना माहेरपण छान केले .

Mrunal Subhash Dandekar

शरयूताईनी जेवणाची व्यवस्था खूप चोख केली . आदरातिथ्य उत्तम . बंगला मस्तच बांधलाय . स्विमिंग पूल मस्तच . पोहायला परत येणार . भिडे फ्यामिलीला घेऊन येणार .

Ketan Subhash Dandekar

आज रोजी ३ वर्षांनी पुन्हा योग्य आला . उत्तम सोय, अप्रतीम जेवण ,नाष्टा ,स्वच्छ टापटीप आवार . जलतरणाची मजा तर काय वर्णावी . तीन वर्षांपूर्वी चार पिढ्यातील नातलग जुन्या वास्तूत राहून गेलो होतोच . तीन वर्षानंतर केलेल्या नव्या वास्तूतील बदलांचा आज लाभ घेत आहोत . हे माझ्या बाबांचे आजोळ असल्याने येथील आदरातिथ्य व नात्यातील गोडवा वाढवीत ,दोनदिवसाच्या सुट्टीचा मस्त लाभ घेऊन दुपारी पुण्याकडे प्रयाण करू . पुन्हा येण्याच्या आशेवर .
मिलिंद शशिकांत गोखले आणि परिवार – पुणे – ( ९५११८८३१२६ )

मिलिंद शशिकांत गोखले आणि परिवार - पुणे - ( ९५११८८३१२६ )

अप्रतीम व्यवस्था आणि प्रेमळ घरगुती वातावरण . खाण्याच्या विविध आणि विशिष्ट व्यंजनांनी सर्वजण तृप्त झालो . अतिशय स्वच्छ आणि टापटीप ,विविध activitis असलेला बांगला . दोनदिवस नुसते उडून गेले .

Rohan Shilpa Vijay Deodhar रोहन शिल्पा विजय देवधर ९५९४७६३४३३ 9594763433

उत्तम व्यवस्था, अगत्यशील माणसे ,नावाप्रमाणे माहेरची तसेच आजोळची आठवण झाली .

चंद्रकांत धोपटे Chandrakant Dhopate 9422745726९४२२७४५७२६

Fivestar facilities with homely atmosphere.
घरगुती वातावरणात पंचतारांकित सुविधा

Shrikant Gadre श्रीकांत गद्रे

सासवणे ट्रीप डिसेंबर 2020…..

एकूणातच हे वर्ष गेले खडतर अती
सकळ जणांची कुंठोनी गेली मती
टांगती तलवार असे जणू डोक्यावरती
जो तो शोधण्यासी निघे मनःशांती

अशात बेत येई सामोरी सासवण्याचा
गोखले कुटुंबियांच्या एकत्र सहलीचा
तीन पिढया मिळूनी मज्जा करण्याचा
लाभ घ्यावयासी निघती माहेरपणाचा

कूच करती मंडळी मस्त प्रसन्न सकाळी
ढोकळा, केकचा आस्वाद घेती जाता जाता
पोचती मुक्कामासी मध्यान्हीच्या वेळी
आत्या काका सामोरे येती प्रेमपूर्वक स्वागता

वास्तू असे भव्य आणिक सुंदर सुशोभित
बघूनी तया माहेरा मन होतसे प्रफुल्लित
सर्वांसी जणू मिळतसे मायेचा ओलावा
डोळे मिटोनी घ्यावा मनसोक्त विसावा

खेळाची विविध साधने मनासी रिझवीती
भोवरे विटीदांडू सापशिडी कॅरम लक्षवेधी
लाभ घेती सगळे पत्त्याचा डावही मांडीती
गप्पांचा फडही जमतसे अनेक विषयांवरती

मस्त चंगळ चालतसे चविष्ट खानपानाची
मोदक बिरड्या भाकरी भरीत भाजी पनीरची
सुरमई फ्राय भात कोळंबीचा ग्रेव्हीचा झटका
सायंकाळी चापिली सर्वांनी खमंग भजी

मनसोक्त हुंदडले सगळे सागराच्या किनारी
क्षण सूर्यास्ताचे टिपले तृप्त होती मने अंतरी
निसर्गरम्य कोकण लयलूट फोटो व्हीडीओची
परतीच्या वाटेवरी हौस पुरी होय वडापावची

उजाडे दिवस दुसरा असे हाही अति खास
प्रभाकर काकांचा साजरा केला वाढदिवस
न्याहारी दमदमीत आम्लेट भाजणी वड्यांची
आता वेळ असे स्विमिंग पुलावरी खेळण्याची

मंडळी झाली मस्त खादाडी अन खेळाने
जणू मैफिल जमे गायनाची करावके साथीने
मस्त कथ्थक नृत्याने रीमाने आणिली बहार
मोरया काकांच्या वाडीवरी फिरलो घटका चार

अंगतपंगत बसली नंतर सुग्रास भोजनाची
पुरणपोळी खमंग साथ कोथिंबीर वडीची
पत्त्याचा डाव रंगला अखेरी वेळ निघण्याची
सांगता होतसे अशी एका सुंदरशा सहलीची

कसे न कळले दिवस दोन झरकन सरले
गोखल्यांच्या माहेरी नाते अधिक दृढ झाले
बांधून ठेविले सासवणेकरांनी अगत्यासी
निघताना आपसूक नाळ जुळली माहेरासी

– तुषार गोखले

तुषार गोखले

It’s a home away from home. We were at ease and very comfortable. The ambience is superb. A dream home with lot of greenery and sea shore nearby. Delicious food served by Sharyu Vahini. It was my dream to laze around and have good food which was never possible in my house
A very big thank you to Tamhankar Dada & Vahini an experienced to be tresured for lifetime.
Kalpana Potnis.

Mrs. Kalpana Potnis 9619560231 & Mr. Mohan Potnis 9619570231

We were in Maher on 17 & 18th Nov 20
Throughly enjoyed , Beautiful house , Great Experiance , Well maintained , Good surroundings , Great and helpful People , Coming Back Again.
Dr. Rajashree A Deshpande
9769952029
Mr Samarth AKulkarni
8879093590
Kalyan.

Dr. Rajashree A Deshpande 9769952029 & Mr.Samarth A Kulkarni 8879093590

We’ve been to ‘Maher’ on 16th Nov 2020.
The rooms are spacious & clean. But the real USP is food. Full marks to Tai for the superb food & hospitality. Worth visiting.

Bipin M Harchekar

माहेर गावाकडच घर.

सासवणे गावांत अलिबाग जवळ, श्री कौस्तुभ ताम्हनकर व सौ शरयू ताम्हनकर यांच्या बंगल्यात फारच उत्तम पाहुणचार घेतला. उत्तम भोजन आणि उत्तम निवासाची व्यवस्था. अतिशय प्रेमाने दिलेली सेवा. खरोखरीच माहेरी आल्यासारखे वाटले. खूप छान वाटले. Totally relaxed. That too at very reasonable cost.

तुम्ही पण अवश्य जा आणि अनुभव घ्या.

संपर्क शरयू ताम्हनकर 9967068246

Nitin Shripad Joshi

Truely ‘Maher’!!
Amazing stay at this charming banglow. Very well managed by Mr. and Mrs. Tamhankar. Excellent food, very specious, clean and well equipped rooms. Very close to beach, 5 min walking distance. A must visit place for a great weekend gateaway.
——- Varada Patwardhan

Varada Patwardhan

Great place , excellent food, big and clean rooms. Great hospitality by Kaustubh & Sharayu Tamhankar. Highly recommended….

Vikas Pathak

माहेर!
एक अत्यंत सुखदअनुभव!
माझी माहेराला ही तिसरी भेट. या पूर्वी दोनदा TMPC च्या मित्रांसमवेत आलो होतो आणि त्याचवेळी सहकुटुंब येण्याचे निश्चित केले होते! प्रत्येक वेळी आलेला अनुभव आणि आदरातिथ्य अप्रतीम!
माहेरचा अतिशय स्वच्छ परिसर, कौस्तुभ आणि शरयू वहिनींचे अतिशय आपुलकीयुक्त लाघवी आतिथ्य आणि अत्यंत चविष्ट, तुमच्या आवडीनुरूप बनवलेले अप्रतीम न्याहारी व भोजन! आणखी काय पाहिजे? माझ्या पत्नीला तर माहेरी आल्यासारखेच वाटले!
सर्वच व्यवस्था उत्तम.
माझ्या कुटुंबासमवेत पुन्हा नक्की येणार!

कुमार मोरे

Excellent place. Three hours drive from Thane at most.

Calm and quiet. One can get a great relaxing and refreshing experience here.

Host are very welcoming and they make you feel at home.

Food is excellent. Quite tasty, good variety, served quite well.

Spotlessly clean. I am yet to see a place cleaner than this one.

3-4 minutes walk from the beach, which is like a private beach only.

I’m sure I will come here again and again. Enjoyed my stay thoroughly.

Satish Pendse

आम्ही शालेय मित्रांनी माहेर येथे मेळावा संपन्न केला. आम्हा मित्रांना एक सुखद अनुभव आला. कोकणच्या सौंदर्याची अनुभूती व प्रेमळ सौहार्द पूर्ण आदरातिथ्य
अनुभवायला मिळाले. माहेरचा परिसर अतिशय स्वच्छ असून मनोरजनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. न्याहारी व जेवण व्यवस्था उत्तम. राहण्या साठी व सहकुटुंब भेट देण्यास उत्तम. मी माझ्या कुटुंबासमवेत पुन्हा भेट देऊ इच्छितो.

Dr.Prakash Desai

काहीच कल्पना नसतांना, आमच्या काही मित्रांबरोबर ‘माहेर’ मध्ये येणे झाले. वहिनी नव्हत्या, तरीही कौस्तुभने छान अगत्य केले. पहिल्याच भेटीत एकेरी बोलणे, लाघवी स्वभाव आणि सुंदर जागा याने मन भारावून गेले. धन्यवाद कौस्तुभ! पुनः पुन्हा नक्की येऊ.

विजय विनायक कुलकर्णी

Real Maher. Excellent hospitality. Nice food. Personal touch of Kaustubh and Sharayu Tamhankar. Enjoyed every moment of stay.

Ramchandra Burande

मी माझ्या शाळकरी मित्राबरोबर माहेर मधे दोन दिवस राहीलो. खूप मजा आली. कौस्तूभचे स्वागत मस्त. सर्व व्यवस्था सुंदर.

Jayant G Kulkarni

माहेर:

गावाकडे कोकणात
लाभे मायेचे माहेर
प्रेम जिव्हाळ्याचा जेथे
भरभरून अहेर
फुलाझाडांच्या कुशीत
देखणेसे घरकुल
आंबा नारळीपोफळी
हिरवीशी रानभूल

मंतरल्या वाटा नेती
थेट सागराच्या तीरी
बिंब केशरी कलश
आंदुळतो लाटांवरी

देई विसावा माहेर
नाश्ता भोजनाचा थाट
चहा पाणी हवे -नको
राती ‘पोपटी’चा माठ

प्रत्येकास विसाव्यास
असे ‘माहेर’ असावे
घेतांना निरोप वाटे
पुन्हा पुन्हा येथे यावे.

©शोभा बडवे.
9325509677

Shobha Badave

‘माहेर’च्या अंगणात
ठाण्यातील माझे उद्योजक स्नेही मला म्हणायचे, ‘सासवन्याला माझं माहेर नावाचं रिसाॅर्ट आहे.’ त्यावर मी. त्यांना म्हणत असे, ‘मला तिथं यायला आवडेल. कारण बागदांडे, सारळ, रेवस आणि अलिबाग परिरात माझं बालपण गेलंय.’
आणि खरोखरच त्यांनी आमची विनंती मान्य केली.
मी, माझी पत्नी आणि आणि आमचे व्याही री. प्रदीप आणि सौ. मृणाल गडकरी असे चौघेजण इथं आलो. तो त्यांचं ‘माहेर’ खरोखरच कुणालाही आपलंसं‌ करणारं आहे.
मुळात ते एक यशस्वी उद्योजक, शिवाय ‘गोट्या’चे लेखक ना. धों. ताम्हणकर त्यांचे आजोबा. तेव्हा त्यांच्याकडून रसिकता नातवामध्ये पुरेपूर उतरलेली. त्यांच्या पत्नींचं -शरयूबाईंचं- सासवनं‌ हे माहेर. स्वाभाविकच इथं त्यांनी प्लाॅट घेऊन घर बांधलंय. ते अत्यंत विचारपूर्वक. इथली प्रत्येक वस्तू त्यांची सौंदर्यदृष्टी दर्शवणारी आणि उपयुक्ततेचं भान स्पष्ट करणारी. घराची विस्तृत रचना, दर्शनी भागात व्हरांड्यात आणि आतल्या भल्या मोठ्या दिवाणखान्यातले दोन‌ झोपाळे. प्रशस्त शयनगृहं, दोन प्रशस्त स्वयंपाकघरं, मागच्या पडवीत असलेलं डायनिंग हाॅल, वर तशीच शयनगृहं, काॅस्फरन्स रूम आणि वर मोठीच्या मोठी टेरेस. तिथं अगदी वर सोरल युनिट. घराच्या मागच्या बाजूला एक छोटेखानी आकर्षक स्विमिंग पूल. घराच्या सभोवताली सिमेंटने बांधलेल्या कंपाऊंडच्या भिंतींवर नाना रंगी आणि सुंदर फुलझाडं. निवडक आंबा, माड, जांभ यांचे वृक्ष. ‘माहेर’ ही वास्तू पाहाणं हा एक सुखद अनुभव आहे.
आणि त्याहूनही अतिशय विलोभनीय आहे ते कौस्तुभ आणि शरयू ताम्हणकरांचे आदरातिथ्य. त्यांचा सहजसुंदर मोकळेपणा अपरिचितालाही सहज सामावून घेणारा. ‘माहेर’मध्ये आपण आलो की, एका वेगळ्याच प्रसन्न‌ वातावरणाचा आपण अनुभव घेतो.
*
सासवनं हे समुद्रकिना-यालगत आहे. आपल्याला आतूनच समुद्राची ओढ असेल आणि भरती -ओहटीच्या वेळा ज्ञात असतील तर समुद्राच्या सानिध्यात कित्येक तास आपण घालवू शकतो. आपल्याला निरव शांतता अनुभवायची असेल तर‌ तोही अनुभव आपण घेऊ शकतो.
मुळात सासवनं गावात तलाव -आणि कमलदलं असलेले तलाव- आहेत. गावात देवळं आहेत आणि १९६०-१९६५च्या दरम्यान इथं होते त्या मधुकरबुवा पेडणेकर यांचे स्थानही जवळ आहे. सासवन्याला शिल्पकार करमरकरांची शिल्पं पाहायला मिळतात.
सासवनं-धोकवडं- झिराड ही गावं अनुक्रमे विभावरी शिरूरकर, गंगाधर गाडगीळ आणि दुर्गा खोटे यांची. इथं आल्यावर त्यांचं स्मरण होणं स्वाभाविक असतं.
*
इतर गावांचं जे होतंय ते सासवन्याचंही होत आहे. नारळी पोफळीच्या झाडांनी गच्च भरलेलं गाव. इथली बरीचशी माणसं नोकरीसाठी मुंबई-पुण्याकडं गेलेली आणि इथल्या जमिनींवर उद्योगपती-अभिनेते-खेळाडू आणि राजकारणी यांची नजर. इथं फार्म हाऊसेस, रिसाॅर्टस् निर्माण झाले.
गावही हळूहळू बदलत आहे. शाळा, ज्यूनीअर काॅलेज आता आहे. नवनव्या सुधारणा-सुविधा यांनी समृद्धता वाढत आहे. सासवन्याला जवळच मांडवाजेटी. तिथून पाऊण तासात मुंबई गाठता येते. सासवन्याच्या जवळच डोंगरावर कनकेश्वराचं पुरातन मंदिर. किहीम किना-यासमोर खांदेरी-उंदेरी. अलिबागला तर आॅब्झर्व्हेटरी. कुलाबा किल्ला.
मत्स्यप्रेमींसाठी तर इथं पर्वणी. ताजे, खवले असलेले अनेक जातींचे मासे अलिबागच्या बाजारात उपलब्ध आणि तोंडली, वांगी, वालाच्या शेंगा, चिंच नि रातांबे मुबलक. या भागात आता टुरिस्ट सेंटर्स निर्माण झाली, आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत चेंज म्हणून येणारांची संख्या वाढली.
*
अशी पार्श्र्वभूमी असलेल्या सासवन्यात ‘माहेर’ वसलेले आहे. श्री. ताम्हणकर इथं अनेक वर्षं येताहेत. आधी साध्या घरात ‘माहेर’ थाटलं गेलं. तिथलं त्या उभयतांचे आप्त, स्नेही, त्यांचे स्नेही अशा समानशीलांचं येणं वाढलं. हळूहळू ‘माहेर’चं नाव वेगवेगळ्या वर्तुळात पसरलं. कधी नातेवाईक, कधी ज्येष्ठ नागरिक, कधी कलावंत इथं येऊ लागले. इथल्या आस्थेनं, स्नेहानं, रुचकर जेवणानं माणसं जोडली गेली. परस्परांच्या ओळखीनं आणखी माणसं येत गेली. हळूहळू ‘माहेर’चा एक परिवार होत गेला आणि त्याचा परिघ सतत वाढता राहिला.
ताम्हणकरांच्या ठिकाणच्या अकृत्रिम स्नेहानं व्यावसायिकतेच्या पलिकडं जाऊन कौटुंबिक जिव्हाळा, आपुलकी आणि अन्नपूर्णेच्या हातचं साधं, रूचकर, चविष्ट जेवण यामुळं ‘माहेर’नं‌ अनेकांची मनं जिंकली.
*
आम्ही आलो तो हो, आमचं भाग्य असं की या हिवाळ्याच्या मोसमात चक्क पोपटी लावलेली पाहाण्याचा आणि नंतर तिचा आस्वाद घेण्याची संधी आम्हांला मिळाली. ‘माहेर’मधून बाहेर पडताना मला खात्री आहे की ताम्हणकरांच्या ओठांवर ‘पुनरायगमनायच’ असेच शब्द असावेत.
*
शहरातील दगदगीतून मुक्तता करून घेऊन ताजेतवाने होण्यासाठी आपण बाहेर पडणार असू तेव्हा चटकन आपल्याला “माहेर”ची हमखास आठवण व्हावी आणि पावलं ‘माहेर’च्या दिशेनं पडावीत. कारण ‘माहेर’चं ब्रीदवाक्य आहे : ‘गावाकडचं घर’. आणि आपल्या घराला दुसरा पर्याय नसतो.
**
अनंत देशमुख
८६८९९७८७४४

Anant Deshmukh

लाडक्या लेकीचं हक्काचं घर – ‘ माहेर ‘
जावयाचे हट्ट पुरवणार – ‘ माहेर ‘
अतिथींचे आगत स्वागत करणार – ‘ माहेर ‘
शून्य कचरा निर्मितीचे आग्रही – ‘ माहेर ‘
प्रि वेडिंग शूट चा फेवरीट स्पॉट – ‘ माहेर ‘
सासवणे गावाचं आभूषण – ‘ माहेर ‘
आतिथ्यशील ताम्हनकरांचं – ‘ माहेर ‘
आवर्जून यावं असं – ‘ माहेर ‘
माहेर …. गावाकडचं घर

Shubhangi , Ajit Kale

माहेरचं वातावरण अनुभवायचं असेल तर, खरचं एकदा “माहेरला ” नक्की भेट द्या. खूप मस्त सेवा व गोड प्रेमळ माणसं.

रविराज मोरे
पुणे

रविराज मोरे

सर्व व्यवस्था , जेवण , नाष्टा , उत्तम .
अशोक जोशी
डोंबिवली
२२-१२-२०१९

Mr. Ashok Joshi

नेहमीप्रमाणे आपुलकीचे आणि खरोखर माहेरपणाला आल्यासारखे वाटले .. आपलेच घर …. ‘ माहेर ‘
धनश्री केळकर
ठाणे
२२-१२-२०१९

Mrs. Dhanashri Kelkar

‘ माहेर ‘ – नावाप्रमाणे माहेरपण झाल्यासारखे वाटले . स्वच्छता खूप चांगली आहे . खासकरून चादरी , अभ्रे , पडदे , खूप चचं आहेत . स्वच्छ आणि सुंदरतेमुळे परत यावेसे वाटावे असे हे महेर आहे .
मनाली आंबडेकर
अंबरनाथ .
२२-१२-२०१९

Manali Aamadekar

खरोखर माहेरी आल्यासारखे वाटले .स्वागताचा बोर्ड फार आवडला . चादरी आणि अभ्र्यांवरील पेंटिंग सुंदर आहे .
सौ . मनाली वैद्य
ठाणे
२२-१२-२०१९

Mrs. Manali Vaidya

निसर्गरम्य परिसर ,उत्तम पोटोबा , प्रत्येक पदार्थ प्रेमाने केलेला असल्याचे त्याच्या चविष्ट चवीवरून समजत होते . महत्वाचे म्हणजे माहेरी येण्याची आवड सामिष आहाराने पुरवली जात होती . सध्या विस्मृतीत गेलेले खेळ जसे विटिदांडु , कंचे ( गोट्या ) ,भोवरे , दोरीच्या उड्या , याच बरोबर नवे खेळ जसे डार्ट , क्रिकेट , बास्केटबॉल , रिंग टेनिस , ब्याडमिंग्टन हे खेळ सुद्धा आवर्जून खेळायला मिळाले . समुद्रकिनाऱ्यापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे समुद्राचाही आनंद लुटता आला . खूप आवडले .

देशमुख परिवार
राजेश्वर ,अरुंधती , आनंद , मीनल , मुग्धा ,प्रेरणा , सत्येन , अनघा , रिषीत , कवीश .
२७-१२-२०१९
पुणे .

Deshmukh - Group

Beautiful, soothing ambience ,and really relaxing atmosphere complimented with such sweet hospility. Owesom experiance

Sandeep Kulkarni
Aurangabad
27-12-2019

Sandeep Kulkarni

Good decore. Warm welcome with most latest facilitiesand with lots of old games to play . I promise to visit again with my grand chieldren and son in law.

Kish Sahastrabudhe
Kalyan

Kisha Sahasrabudhe

साठीच्या माणसांनी त्यांच्या बालपणी खेळलेले खेळ जसे भोवरा , विटी दांडू , गोट्या हे खेळ आम्हाला परत खेळायला मिळाले . खेळून खूप आनंद झाला . भोवरा फिरला आणि बालपण आठवले . पुन्हा पुन्हा यावे असे आपुलकीचे माहे मस्तच आहे ..

संजय गोंधळेकर
बोरिवली
२९-१२-२०१९ .

Sanjay Gondhalekar- Borivali

खूप छान . स्वागत जेवण विचारपूस . सर्वच छान .

पद्मा कासट
सातारा
०५-०१-२०

Padma Kasat

मस्त कोकणात दुसरे महेर मिळाले
नम्रता मुळे
०५ जानेवारी २०२०

Namarata Mule

दिनांक ४ आणि ५ जानेवारी आम्ही मैत्रिणी माहेरचा पाहुणचार घेऊन परतलो . माहेरच्या शेरे वहीत शेरा लिहिताना माहेरचे यतार्थ वर्णन करणाऱ्या चार ओळी सुचल्या . त्या अशा ….

“माहेरची आठवण
आठवणींची साठवण
साठवण केली जपून कण कण
विसरणे अशक्य आहे एकही क्षण ”

शुभदा गोडबोले
०५-०१-२०२०

Shubhada Godbole

आम्हा सर्वांचा तुझ्या / आपल्या ‘ माहेर ‘ बद्दलचा अभिप्राय :
लोकेशन, इमारत, स्वच्छता, सुख सोयी, तुमचे वागणे सर्व शंभर नंबरी चोख सोने ! विविध खेळ, जलतरण सोय, पर्यटकांना देण्यात येणारे मार्गदर्शन 100% चांगले ! सकाळचे रुचकर स्वादिष्ट भोजन. सॅलड मिळाले. चहा कॉफी चव व तत्परता 100% छान. जिरा सोडा 101%. काही जण परत वेगळ्या ग्रुप बरोबर येण्याचे म्हणत आहेत.
माहेरच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

हेमंत नवरे , पुणे , १५-१२-२०१९